Suzuki Access 125 : अवघ्या 27 हजारात घरी न्या , जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील

466

मुंबई( mumbai) : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल बाईक आणि स्कूटरची निवड करत आहेत. पण त्यात त्या वाहनांचाही समावेश आहे ज्यांचे मायलेज जास्त आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक स्कूटर घेऊन आलो आहोत. सुझुकी अॅक्सेस 125 (Suzuki Access 125) असे या स्कूटरचे नाव आहे. (buy Suzuki Access 125 in just 27000 rupees)

सुझुकी Access 125 ची सुरुवातीची किंमत 85,800 रुपये आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका डील बद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त 27 हजार रुपयांमध्ये ही स्कूटर खरेदी करू शकता. सुझुकी अॅक्सेसमध्ये कंपनीने 124 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे, जे एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. 7000 rpm वर स्कूटर 8.58 bhp पॉवर जनरेट करते, तर 5000 rpm वर जास्तीत जास्त 9.8 bhp टॉर्क जनरेट करू शकते. या स्कूटरमध्ये 6 लीटरची इंधन टाकी आहे, जी 45 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते.

आम्ही तुम्हाला ज्या स्कूटरबद्दल सांगत आहोत ती एक सेकेंड हँड स्कूटर आहे, जी बाईक्स 24 वर लिस्टेड आहे. ही स्कूटर सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध आहे. बाइक्स 24 वर सूचीबद्ध असलेल्या सुझुकी अॅक्सेस 125 स्कूटरची किंमत फक्त 27 हजार रुपये आहे. हे 2015 चे मॉडेल आहे. विक्रेत्याने या स्कूटरचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. तसेच या स्कूटरने 35 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. ही स्कूटर दिल्लीच्या DL-08 मध्ये नोंदणीकृत आहे.

बाइक्स 24 वर सूचीबद्ध असलेल्या या स्कूटरचा तपासणी अहवाल (इंस्पेक्शन रिपोर्ट) देखील देण्यात आला आहे, ज्यामध्ये वेबसाइटच्या एक्झिक्युटिव्हने अनेक मुद्दे तपासले आहेत. मात्र, बाईक्स 24 ने या स्कूटरचा नंबर दिलेला नाही. वेबसाइटवर सूचीबद्ध असलेल्या फोटोमध्ये ही स्कूटर चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही बाईक्स 24 वरुन घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here